Wednesday, July 30, 2025
Homeसांगलीमहिला पोलिसच निघाली सावकार ; अधिकारामुळे केला गैरकारभार..!

महिला पोलिसच निघाली सावकार ; अधिकारामुळे केला गैरकारभार..!

taji batmi….
सांगली : 6 लाख 95 हजारांच्या कर्जापोटी 18 लाख 18 हजार रुपये वसूल करून आणखी 7 लाखांची धमकी देत घराची कागदपत्रे घेणाऱ्या महिला पोलिसासह चार खासगी सावकारांना सांगली शहर पोलिसांनी अटक केली आहे. 1 जून 2019 ते 17 जून 2022 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. महिला पोलीस कोमल रामचंद्र धुमाळ (वय 32), वैशाली रामचंद्र धुमाळ (वय 48), अमित रामचंद्र धुमाळ (वय 27, तिघे रा. बाबर चाळ, कोल्हापूर रोड), अभिजित कोकाटे (वय 31) अशी अटक केल्याची नावे आहेत, तर सोनम अभिजित कोकाटे (दोघे रा. माधवनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

अशोक पोपट पाटील (वय 34, रा. शिवशंकर चौक, सांगलीवाडी) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक पाटील हे आपल्या कुटुंबीयांसह सांगलीवाडी येथील शिवशंकर चौक येथे राहतात. त्यांनी संशयित कोमल धुमाळ, वैशाली धुमाळ, अमित धुमाळ, अभिजित कोकाटे आणि सोनम कोकाटे या सावकारांकडून आठवडा 10 टक्के व महिना 40 टक्के अव्वाच्या सव्वा व्याजाने 6 लाख 95 हजार रुपये घेतले होते. आरोपींनी फिर्यादी अशोक पाटील यांच्याकडून मुद्दल व व्याजासह तब्बल 18 लाख 18 हजार रुपये इतकी रक्कम रोखीने व गुगल पेद्वारे वसूल केली. तरीदेखील पाच आरोपींनी पाटील यांना धमकी देऊन व शिवीगाळ करून आणखी 7 लाख रुपयांची मागणी केली. त्यासाठी त्यांचे राहते घर करारपत्राद्वारे लिहून घेतले आहे.

तारण म्हणून बँकेचे 6 चेक व 4 कोरे स्टॅम्प घेऊन त्याचा गैरवापर करून नुकसान पोहोचविण्याची धमकी दिली. सावकारांकडून वारंवार होणाऱया त्रासाला कंटाळून पाटील यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. संशयित सावकारांनी केलेल्या छळवणुकीची गंभीर दखल घेत तपासाची चक्रे गतीने फिरवून पोलिसांनी पाच संशयितांवर सावकारी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर चौघांना तातडीने अटक करण्यात आली. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विजय कार्वेकर, उपनिरीक्षक विजय सुतार, सिद्धार्थ कांबळे, गौरी दळवी, पूजा संकपाळ, रोहन गस्ते, रणजित जाधव यांनी ही कारवाई केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक विजय कार्वेकर तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -