Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापूर ; अपघातात गंभीर जखमी झालेल्या जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू

कोल्हापूर/दत्तवाड – सैनिक टाकळी ता शिरोळ येथील जवान दिगंबर कृष्णाजी चव्हाण( वय २५) कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. चव्हाण यांचे वडील आजारी असल्याने, ते सुट्टी घेऊन गावी आले होते. गुरुवारी दिनांक ७ रोजी वडिलांना पाहण्यासाठी जयसिंगपूर येथे गेले असता शिरोळ जयसिंगपूर रस्त्यावर अपघातात ते जखमी झाले होते.

प्रथम त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण ते गंभीर असल्याने त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान शनिवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -