Monday, July 7, 2025
Homeसांगलीसांगली : वाळवा तालुक्यात वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा

सांगली : वाळवा तालुक्यात वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा

काहीशा विश्रांतीनंतर सोमवारी वाळवा तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू होती. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी काहीशी विश्रांती घेतल्यानंतर सोमावारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. प्रांताधिकारी संपत खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी नदीकाठच्या गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -