कडेपूर येथील सर्पमित्र दादासाहेब तुकाराम पोळ (वय 56) आणि हर्षल दादासाहेब पोळ (21) यांनी घोरपडीची शिकार केली. तिचे मांस खाल्ले, अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने दोघांनाही अटक केली आहे. येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना एक दिवसाची वनकोठडी सुनावली आहे.
कडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेली माहिती अशी ः कडेपूर (यादव मळा) येथील वैभव कदम यांच्या घरी शनिवारी (दि.18) घोरपड आढळली. ती पकडण्यासाठी त्यांनी गावातील सर्पमित्र दादासाहेब पोळ याला बोलावले.
पोळ याने कदम यांच्या घरी जाऊन घोरपड ताब्यात घेतली. मात्र, याबाबत वनविभागाला टीप मिळाली होती. त्यामुळे सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजने, कडेगाव-पलूसच्या वनपरिक्षेत्र अधिकारी पल्लवी चव्हाण,वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांच्या पथकाने तात्काळ कदम यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी ती घोरपड दादासाहेब पोळ हा त्याच्या शेताकडे घेऊन गेला आहे, असे सांगितले.
वनविभागाच्या पथकाने पोळ याच्या कडेपूर-विटा रस्त्यावरील शेतामध्ये जाऊन तपासणी केली.त्यांना गोठ्याजवळ घोरपडीचे काही अवयव व मांस जळालेल्या अवस्थेत दिसले.यावेळी तेथे असलेल्या हर्षल पोळ याच्याकडे पथकाने चौकशी केली. मात्र दादासाहेब पोळ याने ताब्यात घेतलेली घोरपड वनविभागाच्या ताब्यात दिली नव्हती किंवा वनविभागाच्या परवानगीने नैसर्गिक अधिवासात सोडली नव्हती असे आढळून आले.
घटनास्थळी आढळून आलेले घोरपडीचे अवयव व मांस पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.त्यातील काही नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथे पाठवण्यात आले. संशयित दादासाहेब पोळ व हर्षल पोळ यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली.
वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण,वनपाल साळोखे,ठोंबरे,वनरक्षक भाग्यश्री कुंभार,अभिजित कुंभार,अनिल कुंभार,सुनील पवार हे या प्रकरणी तपास करीत आहेत.
घोरपडीची शिकार करून खाल्ले मांस ; दोघांना अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -