Monday, May 27, 2024
HomenewsOnline learning मुळे मुलांच्या द़ृष्टीदोषांत वाढ; तिरळेपणाचा धोका!

Online learning मुळे मुलांच्या द़ृष्टीदोषांत वाढ; तिरळेपणाचा धोका!


कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून सध्या ऑनलाईन शिक्षण (Online learning) सुरू आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून उच्च माध्यमिक वर्गांपर्यंत ऑनलाईन शिक्षण कोरोनामुळे दीड वर्षांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ नये म्हणून सध्या ऑनलाईन शिक्षण (Online learning) सुरू आहे. दररोज तीन ते चार तास मोबाईल, कॉम्प्युटरसमोर बसल्याने मुलांच्या द़ृष्टीदोषांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. यातून मुलांमध्ये तिरळेपणाचा धोका वाढत असल्याची चिंताही नेत्रतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून राज्यभरातील शाळा-महाविद्यालये बंद आहेत. मुलांच्या शिक्षणावर त्याचा दुष्परिणाम होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना पुढे आली आणि दोन वर्षांपासून ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू झाले. आज काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या असल्या तरी लहान मुलांना काेराेनाचा धोका नको, यासाठी त्यांच्या शाळा ऑनलाईनच सुरू आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातही पालकांनीही मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी नवीन मोबाईल घेतले. मुलांचे खासगी क्लासेसही आता ऑनलाईन झालेत. शाळांच्या झुम मिटिंग्जद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एवढेच नव्हे तर, आता परीक्षादेखील ऑनलाईन झाल्या आहेत. सरते शैक्षणिक वर्ष प्रत्यक्ष पारंपरिक परिक्षांविनाच गेले.

मोबाईलचा वापर सर्वाधिक
विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढच्या वर्गात गेले. आज पुढच्या वर्गातील शिक्षणही ऑनलाईनच सुरू आहे.
या ऑनलाईन शिक्षणासाठी (Online learning) मोबाईल, कॉम्प्युटरचा वापर विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. यात मोबाईलचा वापर सर्वाधिक प्रमाणात होत आहे.
सतत मोबाईलच्या वापरामुळे अनेक लहान मुलांना मोबाईलचे व्यसन जडण्यास सुरूवात झाली आहे.
बाल वयातच हातात मोबाईल मिळाल्यामुळे शिक्षणाच्या नावाखाली मोबाईलमधील गेम्स खेळण्याकडेही मुलांचा कल वाढला आहे.
मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आता समोर येण्यास सुरूवात झाली आहे.
डोळ्यांची आग होणे, डोळे लाल पडणे, चष्मा लागणे किंवा असलेल्या चष्म्याचा नंबर वाढणे असे प्रकार आता वाढत आहेत. मोबाईलद्वारे शिकताना त्यातून मिळणारी माहिती आत्मसात करण्यासाठी विद्यार्थी बरेचदा डोळ्यांची पापणी न हलवता सतत मोबाईलमध्ये पाहतात.
अशावेळी डोळे आकुंचले जाऊन त्यातून तिरळेपणासारख्या द़ृष्टीदोषाला सामोरे जावे लागते. अशी अनेक उदाहरणे नेत्रतज्ज्ञांनी आतापर्यंत हाताळली आहेत. लहान मुलांमध्ये डोळ्यांचे विकार वाढत असल्याचेही नेत्रतज्ज्ञ सांगत आहेत.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण (Online learning) अपरिहार्य असले, तरी लहान मुलांमध्ये याचा दुष्परिणाम आता दिसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे याबाबत गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पुढच्या काळात बाल वयापासूनच मुलांमध्ये दृष्टीदोष होण्याचे प्रूमाण वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
डोळ्यांबरोबरच कानांचेही आजार वाढले!
ऑनलाईन शिक्षण घेताना मोबाईल हेडफोन, इयरफोन किंवा ब्लूटूथच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कानांच्या आजाराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढल्याचे निरीक्षणही वैद्यकीय तज्ज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांत मुलांमध्ये कानांचे आजार वाढले आहे. नैसर्गिक क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणाच्या ध्वनिलहरी कानाच्या पडद्यावर पडत असल्याने अंतर्कर्णातील पेशींवर ताण पडत आहे.
ब्लूटूथ, इयरफोन आणि हेडफोनमुळे आवाज थेट कानांच्या पडद्यावर जाऊन आदळत आहे. यातून ऐकू न येण्याबरोबरच कानांचे अन्य आजार वाढू लागले आहेत.
मोबाईलचे हेडफोन, ब्लूटूथच्या अतिवापराने विद्यार्थ्यांमध्ये कानांच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
लहान मुलांची चिडचिड वाढली!
सतत लावून ठेवलेले हेडफोन, इयरफोन व ब्लूटूथमुळे कानांच्या दुखण्यांबरोबरच रक्तदाब, नैराश्य, चिडचिड यामुळे मानसिक आजारही बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शिक्षकांचे शिकवणे ‘इअर फोन’द्वारे ऐकत मुले शिक्षण समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जिमेल तितके आकलन करीत आहेत. अनेकदा अडचण आल्यास शिक्षकांना विचारणे जमत नाही.
त्यामुळे काही मुद्दे समजून घेणे तसेच राहून जाते. त्यातून मुलांची चिडचिड होते.
ऑनलाईन शिक्षणाचा हा महत्त्वाचा दुष्पपरिणाम विद्यार्थ्यांवर झाला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एखाद्या विषयावरून निर्माण झालेली चिडचिड मुलांच्या संपूर्ण वागणुकीवर परिणामकारक ठरुन त्यांचा स्वभाव अधिक तीव्र बनू शकतो, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -