Saturday, July 26, 2025
Homeमनोरंजनलवकरच पुष्प-2 ची प्रतीक्षा संपणार, 'या' तारखेपासून सुरु होईल शूटिंग

लवकरच पुष्प-2 ची प्रतीक्षा संपणार, ‘या’ तारखेपासून सुरु होईल शूटिंग

कथा आणि कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळे ‘पुष्पा: द राइज’ (Pushpa The Rise) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल करत अनेक रेकॉर्ड (Pushpa Movie Box Office Record) मोडले. या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा: द रुल’ची (Pushpa The Rule) प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे. अशातच एक नवीन अपडेट समोर येत आहे. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल ‘पुष्पा: द रुल’ प्रदर्शित होईल. या चित्रपटाची स्क्रिप्ट अंतिम टप्प्यात असून हा सीक्वल 2023 मध्ये रिलीज होणार आहे. अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या या चित्रपटाची स्क्रिप्ट जुलैच्या अखेरीस लॉक होण्याची शक्यता आहे.

प्रेक्षकांसह अल्लू अर्जुनही या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी खूप उत्सुक आहे. चित्रपटाच्या पहिला भागात अल्लू अर्जुन चंदनाच्या लाकडांचा तस्कर आहे. या पात्रात हिम्मतीच्या जोरावर आणि वेगवेगळ्या आयडिया वापरून त्याने चंदन तस्करी करताना प्रतिस्पर्धी आणि पोलिसांनी जेरीस आणले आहे. चित्रपटाच्या शेवटी, पुष्पा म्हणजेच अल्लू अर्जुनने रश्मिका मंदानाशी लग्न केले. या चित्रपटाचा शेवट अतिशय जबरदस्त असून पुढच्या भागासाठी सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. दुसऱ्या भागात त्याची आणि फहाद फासिल यांची जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. याशिवाय रश्मिका मंदान्नासोबतचे त्याचे वैवाहिक आयुष्यही रोमान्सने भरलेले दिसणार आहे. 15 ऑगस्ट 2022 पासून या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार असल्याचे संकेत निर्मात्यांनी दिले आहे.

350 कोटींचा बजेट

पहिला भागात बॉक्स ऑफिसवर धमाल करणाऱ्या पुष्पा चित्रपटाचा सिक्वेल देखील तितकाच जबरदस्त असणार आहे. या सिक्वलचे संगीत आणि गाणी फायनल झाल्याचे वृत्त आहे. दिग्दर्शक चित्रपटाचे लोकेशन फायनल करत आहेत. निर्माते सिक्वलच्या बजेटवर काम करत आहेत. या सिक्वेलमध्ये अल्लू अर्जुन (पुष्पा) आणि आयपीएस शेखावत यांच्यात टक्कर होऊ शकते. पुष्पा 2 या चित्रपटाचा  बजेट 350 कोटी रुपये झाल्याची चर्चा आहे. ‘पुष्पा: द राइज’चे यश लक्षात घेत अनेक बड्या कंपन्या पुष्पा 2 सोबत जोडण्यासाठी इच्छा व्यक्त करत असून चित्रपट प्रमोशनसाठी डील केले जात आहेत.

‘त्या’ चर्चेचे खंडन

पुष्पा: द रुलच्या सुरुवातीला नायिका श्रीवल्ली म्हणजेच रश्मिका मंदान्ना यांचा मृत्यू होईल, ज्यामुळे संपूर्ण चित्रपट पुष्पा म्हणजेच अल्लूवर केंद्रीत केले जाईल अशी चर्चा चित्रपटाविषयी सध्या सुरु आहे. अशातच निर्माते-दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या कथेबद्दल मौन बाळगले आहे. मात्र चित्रपटातील नायिका श्रीवल्ली बाबतच्या चर्चेचे त्यांनी खंडन केले आहे. दरम्यान, या चित्रपटात अनेक नवीन कलाकारही दिसणार आहे. यासह पुष्पा 2 मध्ये आणखी एक साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीच्या एंट्रीची शक्यता आहे. नकारात्मक भूमिकेत तो दिसण्याची शक्यता आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -