Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : दिवसभर भर उघडझाप ; पंचगंगेला उतार

कोल्हापूर : दिवसभर भर उघडझाप ; पंचगंगेला उतार

कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाचा जोर ओसरला. दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. पावसाच्या उघडिपीने नद्यांच्या पाणी पातळीत वाढीचा वेग संथ झाला. पंचगंगेची दुपारी चार वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत 37 फूट 11 इंचांवर स्थिर राहिलेली पाणी पातळी रात्री 11 नंतर कमी होऊ लागली आहे. तीन बंधाऱ्यांवरील पाणी ओसरल्याने त्यावरील वाहतूक पूर्ववत झाली. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

शुक्रवारी सकाळीच जिल्ह्याच्या अनेक भागांत सूर्यदर्शन झाले. यानंतर अधूनमधून पावसाच्या सरी आणि त्यानंतर पुन्हा उघडीप, मधूनच सूर्यदर्शन, असे वातावरण दिवसभर होते. सायंकाळी सहानंतर आकाश निरभ- झाले. पावसाने उघडीप दिल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. सायंकाळनंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवर गर्दी दिसत होती. पाऊस कमी झाल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढीची गती कमी झाली. पंचगंगेची गुरुवारी रात्री पाणी पातळी 37 फूट 6 इंचांवर गेली होती. यानंतर पाण्याची पातळी वाढत गेली, तरी तिचा वेग अत्यंत कमी राहिला. गुरुवारी रात्री 12 ते शुक्रवारी रात्री नऊ वाजेपर्यंत पंचगंगेच्या पातळीत गेल्या 21 तासांत केवळ पाच इंचांनी वाढ झाली.

सकाळी आठ वाजता पाणी पातळी 37 फूट 8 इंच इतकी झाली होती. दुपारी तीन वाजता ती 37 फूट 10 इंचांवर गेली. दुपारी चार वाजता ती 37 फूट 11 इंचांवर गेली. त्यानंतर पाणी पातळी स्थिर होती. रात्री 11 वाजता ती 37.10 फूट झाली. पंचगंगेचे पाणी शिवाजी पूल रस्त्यावर गायकवाडवाड्यासमोर आल्याने बॅरिकेडिंग लावून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 31.9 मि.मी. पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली. तिथे जिल्ह्यातील सर्वाधिक 77.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. हातकणंगले 9.6 मि.मी., शिरोळ 6.2, पन्हाळा 40.2, शाहूवाडी 26.5, राधानगरी 44.4, करवीर 29.4, कागल 23, गडहिंग्लज 22.5, भुदरगड 44.5, आजरा 54.1, तर चंदगडमध्ये 61 मि.मी. पाऊस झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -