Friday, August 1, 2025
HomeमनोरंजनKatrina Kaif Birthday : 16 वर्षांपूर्वी केली फिल्मी करिअरची सुरुवात, कतरिना कैफ...

Katrina Kaif Birthday : 16 वर्षांपूर्वी केली फिल्मी करिअरची सुरुवात, कतरिना कैफ आज आहे बॉलिवूडची टॉप अभिनेत्री!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा आज वाढदिवस आहे. कतरिना कैफ 39 वर्षांची झाली आहे. मालदीवमध्ये आपल्या पतीसोबत ती वाढदिवस साजरा करणार आहे. कतरिना कैफचा जन्म 16 जुलै 1983 रोजी हाँगकाँगमध्ये झाला. तिचे वडील मोहम्मद कैफ हे ब्रिटीश व्यापारी आहेत आणि तिची आई वकील आहे. कतरिनाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003 मध्ये बूम या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन, गुलशन ग्रोवर, जॅकी श्रॉफ, मधु सप्रे आणि पद्मा लक्ष्मी यांच्यासोबत काम केले होते.

 

मैने प्यार क्यूं किया या चित्रपटात कतरिनाने सलमान खानसोबत काम केले. तेव्हापासून खर्या अर्थाने तिच्या बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. कतरिना कैफ अभिनेता सलमान खान आणि अभिनेता रणबीर कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये होती. कॅटरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे अभिनेता विकी कौशलसोबत लग्न केले. कतरिनाने मैंने प्यार क्यों किया, नमस्ते लंडन, सिंग इज किंग, न्यूयॉर्क, मेरे ब्रदर की दुल्हन, जिंदगी ना मिलेगी दोबारा, एक था टाइगर, जब तक है जान, टाइगर जिंदा है, झीरो आणि भारत या सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. कतरिना कैफ शेवटची अक्षय कुमार सोबत सूर्यवंशी चित्रपटात दिसली होती. ती लवकरच फोन भूतमध्ये दिसणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -