शेअर बाजारातील गुंतवणूक ही अत्यंत जोखीमीची मानली जाते. त्यामुळे अनेकजण शेअर मार्केट पासून लांब राहणंच पसंत करतात. मात्र शेअर बाजारातील मोठी उलाढाल व डोळे पांढरे करणारी आकडेवारी नेहमीच आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे शेअर बाजाराची थोडी का होईना माहिती ठेवणे प्रत्येकालाच आवडतं. शेअर बाजारातील मोठ-मोठ्या कंपन्यांचे शेअर्स हे सर्वांनाच माहिती आहेत. मात्र सर्वात महागडा शेअर कोणता विचारलं तर कदाचित अनेकांना तो सांगता येणार नाही.
भारतीय शेअर बाजारातील सर्वात महाग शेअर म्हणजे MRF कंपनीचा स्टॉक आहे. त्याची किंमत आज 79000 रुपयांच्या आसपास आहे. तर जगातील सर्वात महागड्या शेअरची किमत 4.18 कोटी आहे. या एका शेअरच्या किमतीत तुम्ही भारतात घर, गाडी आणि अलिशान आयुष्य जगू शकता. आता तुम्हाला या कंपनीचे नेमके मालक कोण असा प्रश्न पडला असेल? तर वॉरन बफे हे बर्कशायर हॅथवे इंक (Berkshire Hathaway Inc.) या जगातील सर्वात महागड्या स्टॉक असलेल्या कंपनीचे मालक आहेत. या कंपनीत सुमारे 3,72,000 हुन अधिक कर्मचारी काम करतात.
दरम्यान, बर्कशायर हॅथवे इंक. स्टॉकची किंमत सध्या 4,18,349 डॉलर म्हणजेच 3,33,51,075.12 रुपये आहे. यावर्षी 20 एप्रिल रोजी या शेअरची किंमत 523550 डॉलर म्हणजे 4,00,19,376 रुपयांवर पोहोचली होती. मागील तीन महिन्यांत हा स्टॉक सुमारे 20 टक्क्यांनी घसरला आहे.