ताजी बातमी ऑनलाईन टीम
जिल्ह्यात शनिवारीही पावसाची उघडझाप सुरू होती. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत चढ-उतार सुरूच आहे. जिल्ह्यातील 64 बंधाऱ्यांवर अद्यापही पाणी असल्याने त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गानेच सुरू आहे. पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याने आता पूर ओसरण्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढचे तीन दिवस ग्रीन अलर्ट म्हणजे पावसाचे प्रमाण अगदी कमी राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात दिवसभर ‘श्रावणसरी’ सारखीच स्थिती होती. अधूनमधून होणारे सूर्यदर्शन, यानंतर पाच-दहा मिनिटांसाठी येणारी मोठी सर, पुन्हा उघडीप असेच चित्र दिवसभर होते.