ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली: पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असलेल्या संघर्ष मार्केटमध्ये मुळातच परवानगी नसलेल्या पण बिनधास्तपणे चालू केलेल्या गोवा स्टाईल कॅसीनो सेंटर आणि लॉटरी सेंटरच्या संघर्षातून गँगवॉर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यातील एका गटाने दुसऱ्या दुकानातील संगणक, लॉटरीचे साहित्य, टेबलाची नासधूस केली. स्टेशन चौकातील या प्रकाराने नागरिक, विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सांगलीच्या पोलीस उपाधीक्षकांच्या कार्यालयाजवळील स्टेशन चौकात महापालिकेने खोक्यांचे पुनर्वसन करून त्या ठिकाणी गणेश मार्केट व संघर्ष मार्केट उभे केलं आहे यातील संघर्ष मार्केटमध्ये अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.