Wednesday, April 1, 2026
Homeमहाराष्ट्रपुरात वाहून जाणारी बैलजोडी बाहेर काढण्यात यश : घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

पुरात वाहून जाणारी बैलजोडी बाहेर काढण्यात यश : घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

चंद्रपूर; शेतावर जाण्यासाठी पूर आलेल्या नाल्यातून बैलगाडीने मार्ग काढीत असताना पुराच्या प्रवाहाने बैलजोडीसह शेतकरी वाहून जाऊ लागला. दरम्यान, नाल्यालगत असलेल्या शेतकयांनी प्रसंगावधान राखत शेतकऱ्यांसह बैलजोडीला वाचविण्यात यश मिळवले. या घटनेचा सर्व थरार कॅमे-यात कैद झाला आहे. गहिनीनाथ वराटे असे शेतकऱ्याचे नाव असून, त्याच्याच मालकीची बैलजोडीहोती.

कोरपना तालुक्यातील नांदा येथील नाल्याला आलेल्या पूरात दोन व्यक्तीसह बैलगाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मागील दहा दिवसांपासून हा नाला पुराच्या पाण्याने भरून वाहत आहे. पुलाच्या पलीकडे असलेल्या सात ते आठ गावांना हा नाला पार करून शेतशिवारात जावे लागते. गेली १५ वर्षे या नाल्यावर पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी सरकार दरबारी रखडली आहे. हाच रस्ता पुढे कोरपना- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -