Thursday, June 26, 2025
Homeक्रीडाIND VS ENG 3rd ODI: हार्दिक-ऋषभने इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, पंतची सेंच्युरी, भारताने...

IND VS ENG 3rd ODI: हार्दिक-ऋषभने इंग्लंडच्या गोलंदाजांना धुतलं, पंतची सेंच्युरी, भारताने सीरीज जिंकली


IND VS ENG 3rd ODI: मँचेस्टरच्या ओल्डट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या तिसऱ्या वनडेत भारताने इंग्लंडचा (IND VS ENG) पाच विकेटने पराभव केला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या (Hardik pandya) भारताच्या विजयाचे नायक ठरले. ऋषभ पंतने (Rishabh Pant) शानदार सेंच्युरी झळकावली. त्याने 113 चेंडूत नाबाद 125 धावा केल्या. यात 16 चौकार आणि दोन षटक आहेत. इंग्लंडने विजयासाठी दिलेले 260 धावांचे ल… भारताने 42.1 षटकात पूर्ण केलं.

भारताचा डाव संकटात असताना ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने विजय मिळवून दिला. भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली. भारताची टॉप ऑर्डर आजही कोसळली. पाच षटकात भारताच्या दोन बाद 21 धावा झाल्या होत्या. दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन माघारी परतले होते. रोहित शर्मा चांगला खेळत होता. पण रीस टॉपलीच्या गोलंदाजीवर स्लीप मध्ये त्याने रुटकडे झेल दिला, रोहितने 17 चेंडूत 17 धावा केल्या. यात चार चौकार आहेत. शिखर धवन अवघ्या 1 रन्सवर टॉपलीच्या गोलंदाजीवरच झेलबाद झाला. विराट कोहली (17) आणि सूर्यकुमार यादव (16) धावांवर आऊट झाला. 4 बाद 72 स्थिती असताना, हार्दिक-ऋषभने डाव सावरला.

ऋषभने खेळपट्टीवर सेट होण्यासाठी आधी वेळ घेतला. नंतर मात्र त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांना दाद दिली नाही. त्यांची गोलंदाजी फोडून काढली. ऋषभ पंत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. ऋषभने वनडे मध्ये आज पहिलं शतक झळकावलं.

हार्दिक पंड्या जबरस्त खेळला
हार्दिक पंड्याने आज बॅट आणि बॉल दोघांनी कमाल दाखवली. हार्दिकने आधी गोलंदाजी करताना 7 षटकात 24 धावा देत 4 विकेट काढल्या. यात तीन निर्धाव षटक होती. यावरुन हार्दिकच्या भेदक माऱ्याची कल्पना येते. फलंदाजी करताना त्याने 55 चेंडूत 71 धावा फटकावल्या. यात 10 चौकार होते. ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. या पार्टनरशिपने भारताच्या विजयाचा पाया रचला. हार्दिकने आज चौफेर फटकेबाजी केली. इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याला अनेकदा हुक फटक्याच्या मोहात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने जमिनी लगत फटके खेळले. त्याने पंचवर खूप सुंदर पद्धतीने चौकार वसूल केले. कार्सच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. स्टोक्सने त्याचा जबरदस्त झेल घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -