सध्याच्या काळात बहुतांश जण प्रवास करताना गुगल मॅप (Google Map) चा वापर करतात. गुगल मॅपमुळे अनेकदा प्रवास सोपा आणि आरामदायक वाटतो. Google Maps मुळे Routes समजणं आणि रस्ता शोधण्यासाठी अधिक कोणाला विचारावं लागत नाही. यामुळे कुठेही जायचं म्हटलं तरी विनाटेन्शन जाता येतं. आता येणाऱ्या काही महिन्यात गुगल मॅप्सचे एक नवं फीचर येणार असून हे फीचर केवळ तुम्हाला Traffic पासूनच वाचवणार नाही तर पर्यावरण सुधारण्यास देखील उपयुक्त ठरेल. तसंच या नव्या फीचरमुळे इंधनाचीही बचत होण्यास मदत होईल.
मिळाल्या माहितीनुसार, या नव्या फीचरमध्ये Google Maps त्या मार्गांबाबत सुचवेल, जिथे कमी ट्रॅफिक असेल. ज्यामुळे ड्रायव्हर एकसमान गतीने गाडी चालवू शकेल. अशा Route वर ड्रायव्हरला कमीत-कमी ब्रेक लावण्याची आवश्यकता असेल.
मशिन लर्निंगच्या माध्यमातून रोड ग्रेड, ट्रॅफिक फ्लो आणि तुमच्या प्रवासाच्या अंतराचा अंदाज लावून, तुमच्यासाठी बेस्ट Route चा सल्ला देईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवास सोपा होईल आणि इंधनाचीही बचत होईल. यामुळे ट्रॅफिकही कमी होईल, ज्यामुळे पर्यावरण सुधारण्यास काहीसा हातभार लागेल.
सध्याच्या घडीला गुगल मॅप्सवर कार, बाईक, ट्रेन, बसने जाणाऱ्यांसाठी मार्ग उपलब्ध आहेत. पायी जाणाऱ्यांही गुगल मॅप्स मार्ग दाखवतो. पण सायकलस्वारांसाठी कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे मॅप्सवर ही सेवा देखील लवकरच उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येते.