सांगलीवाडी येथे कदमवाडी मळीत दुपारी दोन भल्यामोठ्या मगरींचे दर्शन झाले. सकाळी एकाच वेळी दोन मगरी दिसल्या. यामुळे मळीभागात काम करणाऱ्या शेतकरी, मजुरांची बोबडीच वळली.
दहा-बारा वर्षांपासून एखादाच दिवस गेला नसेल की नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले नसेल. यावेळी सांगण्यात आले की, दुपारी कदमवाडी मळीभागात नदीकाठाला गवतात महाकाय मगर दिसली. साडे अकरा फूट लांबीची ही मगर आहे. काही अंतरावर दुसरी मगर गवतातच होती. ही मगर साडेसहा फूट लांबीची आहे. मगरी पाहिलेल्या शेतकऱ्यांनी तसेच प्राणीमित्रांनी ही माहिती दिली. दरम्यान, कदमवाडीत वनखात्याचा दिवसभरात एकही कर्मचारी अथवा अधिकारी फिरकले नाहीत.