Wednesday, August 27, 2025
Homeसांगलीसांगली : जिल्ह्यात 3 ते 15 ऑगस्ट 'हर घर तिरंगा' उपक्रम

सांगली : जिल्ह्यात 3 ते 15 ऑगस्ट ‘हर घर तिरंगा’ उपक्रम

भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वराज्य महोत्सव राबविण्यात येणार आहे. यामध्ये जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुखे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील उपस्थित होते.

ते म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते दि. 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने दि. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत देशभरात ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविणार आहे. राज्य शासनामार्फत 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

ते म्हणाले, राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर/ लोकर/ सिल्क/ खादी पासून बनविलेल्या कापडाचे असावेत. राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घ्यावी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कमीत कमी पाच राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दान स्वरूपात सुपूर्द करावेत. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या उपक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -