व्हॉट्स अॅप’वरुन आता बॅंकेची कामेही करता येणार आहेत.. बॅंकेत न जाता, एका क्लिकवर ग्राहकांना ‘व्हॉट्स अॅप’च्या माध्यमातून ही कामे करता येणार आहेत. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या ‘एसबीआय’ने (SBI) तंत्रज्ञानाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकताना ‘व्हाॅट्स अॅप’ बँकिंग (WhatsApp Banking) सुरु केलंय…
‘एसबीआय’च्या शाखेत न जाताही तुम्हाला ‘व्हाॅट्स अॅप’द्वारेही अनेक कामे करता येणार आहेत. त्यासाठी बँकेकडून एक नंबर जारी करण्यात आला आहे.. त्या ‘व्हॉट्स अॅप’ नंबरवर चॅट करुन तुम्हाला बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंटची माहिती मिळवता येणार आहे.. त्याचा वापर कसा करायचा, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
असा करा वापर…
सर्वप्रथम तुम्हाला ‘एसबीआय’मध्ये याबाबत नोंदणी करावी लागेल. त्यासाठी WAREG लिहून स्पेस द्या. त्यानंतर तुमचा खाते क्रमांक लिहून 7208933148 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा लागेल.
हा संदेश पाठवण्याचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. WAREG खाते क्रमांक आणि 7208933148 वर पाठवा.
‘एसबीआय’मध्ये नोंदवलेल्याच नंबरवरुन मेसेज पाठवण्याची काळजी घ्या.
तुमची नोंदणी पूर्ण झाल्यावर ‘व्हॉट्स अॅप’वर ‘एसबीआय’च्या 90226 90226 क्रमांकावरून मेसेज येईल. हा नंबर तुम्ही सेव्ह करु शकता.
बँकेत नोंदणी केल्यावर तुम्ही ‘Hi’ टाइप करुन चॅटिंग सुरु करु शकता. नंतर ‘एसबीआय’कडून पुढीलप्रमाणे मेसेज येईल. . “प्रिय ग्राहक, SBI Whatsapp बँकिंग सेवांमध्ये आपले स्वागत आहे! कृपया खालीलपैकी कोणत्याही पर्यायातून एक निवडा. 1. खाते शिल्लक, 2. मिनी स्टेटमेंट, 3. व्हाट्सएप बँकिंग वरुन नोंदणी रद्द करा..” तुम्ही तुमची शंका देखील टाइप करु शकता.
जर तुम्ही 1 टाइप करुन मेसेज पाठवला, तर तुमच्या खात्यातील शिल्लक रकमेची माहिती येईल. 2 टाईप केल्यावर, तुम्हाला मिनी स्टेटमेंटचा तपशील मिळेल. तसेच, 3 टाइप केल्यास ‘व्हॉट्स अॅप’ बँकिंगमधून नोंदणी रद्द करता येणार आहे..
सध्या ‘एसबीआय’च्या या ‘व्हॉट्स अॅप बँकिंग’वर फक्त या 3 सुविधा मिळतात. हळूहळू त्यात आणखी सुविधा जोडल्या जाणार आहेत. या सुविधेमुळे बँकेत हेलपाटे मारण्याचा त्रास वाचणार आहे.. विशेष म्हणजे, ही सुविधा तुम्हाला 24 तास मिळणार आहे.