मराठी – हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णीचे नाव घेतले जाते. सध्याच्या घडीला मराठीतील (marathi) आघाडीची अभिनेत्री असणाऱ्या सोनालीचे वेगवेगळे फोटो हे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. इंस्टावर देखील सोनालीला फॉलो करणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. ती चर्चेत राहण्यासाठी इंस्टावर वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पोस्ट करत असते.
चाहतेही आपल्या आवडच्या सेलिब्रेटीच्या फोटोंचं तोंडभरून कौतूक करतात. तिला शुभेच्छा देतात. सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये (marathi) गुड न्युजचा माहौल आहे. सोनालीची गुड न्युज असल्याची चर्चा व्हायरल झाली आहे.
चाहत्यांकडून सोनालीच्या गुड न्युजच्या चर्चांना उधाण आल्यानंतर त्यावर सोनालीला त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. सोनाली काय म्हटली हे आपण जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता – अभिनेत्री रणबीर आलियाच्या गुड न्युजनं नेटकऱ्यांना गोड बातमी दिली होती. त्यानंतर वेगवेगळ्या सेलिब्रेटींच्या गोड बातम्या समोर आल्या आहेत. अशातच सोनालीची पण गुड न्युज आहे की काय अशी दबक्या आवाजात चर्चा सुरु असतानाच अभिनेत्रीनं त्यावर चाहत्यांना नेमकं काय आहे हे सांगितलं आहे. त्याचे झाले असे की, सोनालीचे तिच्या इंस्टावर जे फोटो आहेत त्यावर तिच्या चाहत्यांनी वेगळाच अंदाज लावत गुड न्युजच्या चर्चेला सुरुवात केली आहे. मात्र अभिनेत्रीनं अद्याप तसे काही नसल्याचे सांगितले आहे. सोनालीचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला प्रश्न विचारुन भंडावून सोडले होते. एका युझर्सनं फोटोवर प्रतिक्रिया देत लिहिलं, तुमच्याकडे पण गुड न्यूज आहे काय? तर दुसऱ्यानं म्हटलं होतं की, तुम्ही परिधान केलेला हा ड्रेस म्हणजे काही हिंट तर नव्हे.
यासगळ्यात सोनालीनं दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्या प्रतिक्रियेमध्ये सोनाली म्हणते की, जे कोणी विचारत आहे की मी प्रेग्नेंट आहे का, त्यांना सांगते की, मी प्रेग्नेंट नाही. माझा नुकताच स्वप्नातील परफॉर्मन्स तमाशा लाइव्ह भेटीला आला आहे. तो प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन पाहावा. काही दिवसांपासून सोनालीच्या तमाशा लाईव्ह या चित्रपटाची चर्चा होती. तो आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.