Saturday, February 21, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर: ई-सेवा आयोजित शेंडा पार्क येथे वृक्षारोपण उपक्रम

कोल्हापूर: ई-सेवा आयोजित शेंडा पार्क येथे वृक्षारोपण उपक्रम

इलेक्ट्रिकल सेल्स एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन, (ई-सेवा) कोल्हापूर आयोजित रविवार, दिनांक १७ जुलै २०२२ रोजी शेंडा पार्क येथे वृक्षारोपण हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला होता.

ई-सेवा आयोजित वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी मा. श्री शंकरराव पाटील साहेब यांची उपस्थिती लाभली होती. त्यांचे शुभहस्ते या वृक्षारोपण उपक्रम सुरुवात करण्यात आली, त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

ई-सेवा आयोजित वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमासाठी ई-सेवा वृक्षारोपण नियोजन समिती चे राहुल परीट, स्वप्नील चौगुले, विवेक चौगुले (खजिनदार), अनिकेत भोसले, प्रदीप चौगुले, अविनाश माने, केदार जमदाडे, आशिष बामणे, किशोर गुरव (सचिव) यांनी विशेष परिश्रम घेतले.

ई-सेवा आयोजित वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमासाठी श्री. नितीन पाटील, बालवृक्षप्रेमी कोळी, श्री. स्वराज थोरवत, ई-सेवा अध्यक्ष श्री. किरण दीक्षित, उपाध्यक्ष श्री. निखिल पोवार, किसन केंजळे, युवराज बोडके, संदीप बनसोडे, संचालक आणि सभासदांनी उपस्थिती लावली होती.

यापूर्वी ई सेवाने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. शेणीदान उपक्रम, रक्तदान शिबिर, अनेक गरजूना मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.

भविष्यात या सारखे विविध समाजपयोगी सामाजिक उपक्रम करण्याचा मानस ई-सेवा परिवाराचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -