सांगली : जिल्ह्यात मंगळवारी पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. पंधरा दिवसानंतर आज दिवसभर सूर्यदर्शन झाले. यामुळे शिवारात मशागतींची धांदल उडाली आहे. धरण परिसरातही पाऊस कमी झाला आहे. कोयना, चांदोली धरणे पन्नास टक्के भरली आहेत. कृष्णा, वारणा नद्यांचे पाणी पाच ते सात फुटांनी कमी झाले आहे. सांगलीत पाणीपातळी 13 फुटापर्यंत आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात मंगळवार, दि. 5 रोजी जोरदार पावसास सुरुवात झाली. पहिल्या आठवड्यात धरण परिसर व जिल्ह्यात
मुसळधार पाऊस पडला. दुसऱ्या आठवड्यातही पावसाचा जोर कायम होता. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर सलग 10 ते 12 दिवस अतिवृष्टी सुरू झाली. यामुळे धरणांतून पाणी सोडावे लागले. तसेच ओढे, नाले, शेतातील पाणी नद्यांत आले. त्यामुळे कृष्णा, वारणा, मोरणा नद्यांची पाणीपातळी वेगाने वाढली. ढगाळ वातावरणामुळे पंधरा दिवस सूर्यदर्शन झाले नाही. पाऊस व वाढलेले पाणी जिल्ह्यात दहा दिवस तळ ठोकून होते.
सोमवारपासून पाऊस व पाणी हळूहळू कमी होऊ लागले. मंगळवारी मात्र जिल्ह्यात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. सांगली शहर, मिरज, जत, खानापूर-विटा, वाळवा-इस्लामपूर, तासगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, कडेगाव या तालुक्यात
दिवसभर वातावरण स्वच्छ होते. यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला. यामुळे शेतात भांगलण, टोकण, खत टाकणे, आळवणी, फवारणी यासह अन्य कामांची धांदल उडाली आहे.
सांगली : पंधरा दिवसानंतर दिवसभर सूर्यदर्शन
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -