Thursday, July 31, 2025
Homeसांगलीसांगली : महापुराचा धोका तूर्तास टळला

सांगली : महापुराचा धोका तूर्तास टळला

वाड्यावस्त्यांवरील बळीराजा शेतात लावलेले भाताचे तरू | काढून त्याची लावण करण्यात गुंतला आहे.
सांगली : पुढारी वृत्तसेवा : गेली चार-पाच दिवस पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे कृष्णा, वारणा, मोरणा नद्यांचे पाणी पात्रात गेले आहे. जिल्ह्याचा महापुराचा धोका तुर्तास टळला आहे. ऊन-सावलीचा खेळ सुरू असल्याने शेतात मशागतींची धांदल उडाली आहे.

जिल्ह्यात मंगळवार, दि. 5 ते मंगळवार दि. 19 जुलै असा सलग पंधरा दिवस पाऊस पडला. शिराळा काही दिवस अतिवृष्टी झाली. वाळवा, सांगली, मिरज, पलूस तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. याबरोबरच धरण परिसरात पंधरा दिवस दररोज 150 ते 250 मिमी पाऊस पडला. यामुळे कृष्णा, वारणा, मोरणा नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले.

काही ठिकाणी पूल, बंधारे, शेती पाण्याखाली गेली. दोन आठवडे ढगाळ वातावरण होते. हवेत कमालीचा गारवा होता. यामुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते. काही गावे, शहरात विविध साथरोग-आजार पसरले. सोयाबीन, भुईमूग, ऊस, केळीसह अन्य पिकांचे नुकसानही झाले. खरीप पेरणी वाया जाण्याची स्थिती निर्माण झाली होती. आणखी पाच-सहा दिवस अशीच स्थिती राहिली असती तर महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -