Friday, August 1, 2025
Homeसांगलीकृष्णेचे पाणी दुष्काळी माणखटावला सोडा

कृष्णेचे पाणी दुष्काळी माणखटावला सोडा

कृष्णा नदीचे अतिरिक्त पाणी उरमोडी कॅनॉलच्या सहाय्याने दुष्काळी माण-खटाव परिसरातील सर्व पाझर तलाव,ओढे, बंधारे यात सोडून भविष्यातील शेती व पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी वर्धन ॲग्रो कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम यांनी जिल्हाधिकारी आणि कृष्णा जलसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरवर्षी मार्चनंतर उन्हाळ्यात खटाव-माण तालुक्यातील बहुतांशी गावांतील पाण्याची पातळी कमी होऊन पाणी टंचाई निर्माण होते.

हातातोंडाशी आलेली पिके वाळून जातात. त्यामुळे येथील गोरगरीब शेतकरी कायम मानसिक तणावाखाली असतात. सध्या पाऊसकाळ चांगला झाल्याने कृष्णा नदी दुथडी भरुन वाहत जात आहे. या पाण्याचा सातारा जिल्ह्याला काहीही उपयोग होत नाही. हे पाणी आता उरमोडी कॅनॉलद्वारे दुष्काळी भागाला सोडावे. सर्व ओढे, सिमेंट बंधारे आणि पारगाव, येळीव, शिरसवडी, म्हासुर्णे, चोराडे, भूषणगड, होळीचागाव, वांझोळी येथील पाझर तलाव भरुन घ्यावेत. त्यामुळे मार्चनंतर भासणारी पाणी टंचाई भासणार नाही. पिकांना जीवदान मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -