ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघाचे आरक्षण गुरुवारी, दि. 28 रोजी निश्चित करण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांच्यात धाकधूक वाढली आहे. गट, गण कोणत्या प्रर्वगासाठी आरक्षित होणार, याबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला राजकीय दृष्टीने खूप महत्त्व आहे. या निवडणुकीच्या निकालावरच विधानसभा आणि लोकसभेची गणिते अवलंबून असतात. त्यामुळे सर्वच पक्षातील नेतेमंडळी जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविण्यासाठी जीवाचे रान करीत असतात.
नव्या पुनर्रचनेनुसार जिल्हा परिषदेचे 68 गट तर पंचायत समितीचे 136 गण तयार झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या 68 गटांपैकी 42 जागा सर्वसाधारण प्रवर्ग, ओबीसी 18 तर अनुसूचित जातीसाठी 8 जागा आरक्षित राहणार आहेत.