ताजी बातमी ऑनलाईन टीम
धामोड; धामोड (ता.राधानगरी) येथील भानोबा मंदिरात अज्ञात चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी दान पेटीचे कुलुप तोडले पण त्यामध्ये रोख रक्कम नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान, मंदीरातील कोणतीही मौल्यवान वस्तु चोरीला गेलेली नाही. अशी माहीती पुजारी दिपक गुरव आणि देवस्थान व्यवस्थापन मंडळाने दिली आहे.
धामोड गावाबाहेर भानोबा मंदीर आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी भानोबा मंदीराच्या पाठीमागील खिडकीचे गज कापुन मंदिरात प्रवेश केला. दान पेटीचे कुलुप तोडले पण दान पेटीत रोख रक्कम नव्हती. त्यामुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. मंदीरामध्ये उत्सवात पुजेसाठी वापरल्या जाणाऱ्या भानोबा, भावेश्वरी, विठ्ठलाई, नरहरी, मरगाई या देवतांच्या पंचधातुच्या मुर्ती, पंचधातुचे घोडे, आभुषणे, अलंकार, भक्तांनी वाहिलेल्या पंचधातुच्या घंटा, समई, तुतारी. साऊंड सिस्टीम असे लाखो रुपये किमतीचे साहित्य मंदीरात आहे. पण दानपेटी वगळता इतर कोणताही मौल्यवान ऐवज चोरीला गेलेला नाही, असे पुजारी दिपक यांनी सांगितले. याबाबत राधानगरी पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही.
दरम्यान, पाच वर्षांपुर्वी एका माथेफिरूने मंदीरातील मुर्तीची तोडफोड केली होती. तसेच आज चोरीचा प्रयत्न झाल्यामुळे मंदीर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांमधुन होत आहे.