Tuesday, December 24, 2024
Homeइचलकरंजीनृसिंहवाडी-कुरुंदवाड पुलावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थांची गैरसोय

नृसिंहवाडी-कुरुंदवाड पुलावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थांची गैरसोय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नृसिंहवाडी ; महाराष्ट्र कर्नाटक राज्यांना दुवा ठरणाऱ्या नृसिंहवाडी कुरुंदवाड पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक बनले आहे. कारण या पुलावरून मोटारी, एसटी बसेस अथवा अवजड वाहने ये जा करीत असताना पूल हादरत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


शिरोळचे माजी आमदार दिनकरराव यादव यांनी हा पूल उभारण्यासाठी मोठे योगदान दिले होते. त्यांच्या योगदानातून हा पूल साकारला गेला आहे. 1972 साली बांधण्यात आलेल्या या पुलाची 48 वर्षे उलटून गेली आहेत. योग्य वेळी दुरूस्ती होत नाही अशी प्रमुख तक्रार आहे. या पुलावरील रस्ता ठिकठिकाणी उखडला गेला आहे. या पुलाला याआधी 2005 2019 व 2021 यासालीही महापुराचा मोठा फटका बसलेला आहे. उखडलेल्या खाचखळग्याच्या रस्त्याचा त्रास दुचाकी वाहनधारकांना तसेच पादचारी वर्गास होत आहे. या पुलावरून
आंतरराज्य वाहतूक होते प्रवासी वर्गाला महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणे, कर्नाटकातून महाराष्ट्रात येणे सोयीचे होते.

सध्या या पुलावरून दुचाकी चार चाकी एसटी बसेस लक्झरी बसेस तसेच अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. ही अवजड वाहने पुलावरून जात असताना पूल हादरत आहे पादचारी वर्गास याची जाणीव होत आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी या पुलाची सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करावी व स्ट्रक्चरल ऑडिट साठी पाठपुरावा करावा अशी मागणी वाहनधारक तसेच परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -