छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि वादग्रस्त रियालिटी शो (Reality Show) बिग बॉसला (Bigg Boss) प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळते. बिग बॉस हिंदी (Bigg Boss Hindi) पोठापाठ बिग बॉस मराठीला (Big Boss Marathi) देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अशामध्ये बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन (Bigg Boss Marathi Season 4) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंबंधीचा टिझर कलर्स मराठीच्या (Colors Marathi) इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणखी उत्सुकता वाढली आहे.
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा कार्यक्रम अल्पावधितच खूपच लोकप्रिय झाला. आतापर्यंत या कार्यक्रमाचे तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. या तिन्ही सीझनला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पुढच्या सीझनची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. हा सीझन कधी येणार याबाबत सतत विचारणा केली जात होती. अखेर कलर्स मराठीकडून याबाबत इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत बिग बॉस मराठी सीझन 4 ची घोषणा करण्यात आली आहे.
बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे आहेत. महेश मांजरेकरांची सुत्रसंचालनाची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडली. तसंच बिग बॉसच्या घरामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना देखील खूप चांगली पसंती मिळाली. बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये मेघा धाडे विजयी झाली होती. दुसऱ्या सीझनमध्ये शीव ठाकरे विजेता ठरला तर तिसऱ्या सीझनमध्ये विशाल निकमने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावावर केली होती. आता चौथ्या सीझनमध्ये नेकमे कोणकोणते कलाकार सहभागी होणार आणि हा सीझन कधीपासून भेटीला येणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.