Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीसांगली : तासगावमध्ये बाळाच्या अपहरणाचा थरार

सांगली : तासगावमध्ये बाळाच्या अपहरणाचा थरार

तासगाव येथील खासगी प्रसूती रुग्णालयातून एक दिवसाच्या बाळाचे परिचारिकेने अपहरण केले. रविवारी सकाळी आठ वाजता ही धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर अपहृत बाळाच्या शोधासाठी जिल्ह्यातील अख्खी पोलिस यंत्रणा रस्त्यावर धावली. भवानीनगर (ता. वाळवा) येथे बाळाला सुखरूप ताब्यात घेऊन परिचारिकेला अटक करण्यात आली. स्वाती छबू माने (वय 29, रा. मोहोळ, सोलापूर) असे या संशयित परिचारिकेचे नाव आहे.

पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे अवघ्या सहा तासांत या धक्कादायक घटनेचा छडा लागला. तासगावच्या सिद्धेश्वर चौकात प्रसूतीसाठीचे खासगी रुग्णालय आहे. चिंचणी (ता. तासगाव) येथील हर्षदा शरद भोसले या प्रसूतीसाठी शुक्रवारी दाखल झाल्या होत्या. संशयित स्वाती माने गेल्या चार दिवसांपासून या रुग्णालयात कामाला होती. ‘पतीचा अपघात झाला आहे, मला कामाची गरज आहे’, असे सांगून तिने रुग्णालयात परिचारिकेची नोकरी मिळविली.

डॉक्टरांनी तिच्याकडे कोणाची तरी ओळख सांगण्यास सांगितले. त्यावेळी तिने जुळेवाडी (ता. तासगाव) येथे नातेवाईक असल्याचे सांगितले होते. स्वाती रविवारी सकाळी कामावर आली. तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. ती थेट प्रसुतीगृहात गेली. रुग्णालयातील परिचारिका असल्याने तिच्याकडे फारसे संशयाने कोणी पाहिले नाही. तिने कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून हर्षदा भोसले यांच्या बाळाला घेतले. पांढऱ्या रंगाच्या बॅगेत बाळ घालून तिने पोबारा केला. तत्पूर्वी तिने साडी बदलली. संशयित महिला बालकाला घेऊन जात असताना तिने साडी बदलून पांढरा सलवार घातला होता. बाळाला पळवून नेतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. बाळाचे अपहरण झाल्याचे वृत्त समजताच रुग्णालयात खळबळ माजली.

हर्षदा भोसले यांच्या नातेवाईकांनी व गावातील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली. तासगाव पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्वातीच्या शोधासाठी पाठलाग केला. घटनेनंतर जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, तासगाव व विटा पोलिसांचे संयुक्त पथक स्वातीच्या शोधासाठी रस्त्यावर उतरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -