Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरखा. धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी जमावबंदी आदेश लागू

खा. धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी जमावबंदी आदेश लागू

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या खा. धैर्यशील माने यांच्या निषेधार्थ त्यांच्या निवासस्थानावर शिवसेनेच्या वतीने सोमवारी (दि. 25) मोर्चा काढण्यात येणार आहे. निवासस्थानी जमावबंदी आदेश लागू केला आहे. दरम्यान, मोर्चाला विरोध करू नये, असे आवाहन खा. माने यांनी केले आहे. अस्तित्व संपत आलेल्या माने गटाला शिवसेनेने लोकसभेची उमेदवारी देऊन ऊर्जितावस्था आणली. माने कुटुंबाचा सन्मान केला. असे असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्यामुळे हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी सांगितले. सकाळी 11 वाजता मार्केट यार्ड येथील श्री शाहू सांस्कृतिक मंदिर येथून मोर्चास सुरुवात होणार आहे. मोर्चात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोल्हापुरात आल्यावर भूमिका स्पष्ट करू दिल्लीत सुरू असलेल्या अधिवेशनाची सांगता झाल्यावर कोल्हापुरात आल्यानंतर माझी भूमिका मी स्पष्ट करेन. तोपर्यंत संयम राखून मतभेद होणार नाहीत, याची दक्षता सर्वांनी घ्यावी. शिवसेनेचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळे नेमकं हे का व कशामुळे घडले? त्यांचा होणारा आक्रोश व संवेदना मी शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून समजू शकतो. या मोर्चाला कोणत्याही प्रकारचा विरोध होता कामा नये. मोर्चामध्ये सहभागी होणारे कार्यकर्ते, बंधु -भगिनी आपलेच आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे माझं कर्तव्य आहे. अधिवेशन संपल्यानंतर मतदारसंघात येताच आपण भूमिका स्पष्ट करू, असे खा. माने यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडली आहे. (political news)

निवासस्थानी जमावबंदी

खा. धैर्यशील माने यांच्या रुईकर कॉलनी येथील
निवासस्थानावर शिवसैनिक सोमवारी मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या निवासस्थानाच्या 200 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला असून पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -