Saturday, August 2, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समितीची लॉटरी आज फुटणार

कोल्हापूर जिल्हा परिषद, पंचायत समितीची लॉटरी आज फुटणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आरक्षण लॉटरी गुरुवारी फुटणार आहे. जिल्हा परिषदेच्या 76 गटांसाठी (मतदार संघ) आणि बारा पंचायत समित्यांच्या 152 गणांसाठी (मतदारसंघ) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्हा परिषदेत 20 जागा, तर पंचायत समित्यांत एकूण 36 जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव राहतील, अशी शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणासह जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आज गुरुवारी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहावरील राजर्षी शाहू सभागृहात जिल्हा परिषदेसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढली जाणार आहे. पंचायत समितीसाठी प्रत्येक तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता सोडत काढण्यात येईल.



प्रारंभी अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या जागांचे आरक्षण काढण्यात येईल. यानंतर या प्रवर्गातील महिलांच्या 50 टक्के जागांसाठी सोडत होईल. यानंतर अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गाच्या जागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. त्यानंतर इतर मागास प्रवर्गाच्या निश्चित केलेल्या जागांची सोडत होईल. ही सोडत काढल्यानंतर या प्रवर्गातील 50 टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्यात येणार आहेत, त्याची सोडत निघेल. यानंतर उर्वरित खुल्या जागांपैकी 50 टक्के महिलांच्या जागा आरक्षित केल्या जातील. याच पद्धतीने पंचायत समितीसाठीही आरक्षण काढले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -