ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली; पेट्रोल पंपावर गाडी पुढे घेण्याच्या कारणातून झालेल्या वादावादीतून विशाल वसंत पाटील यांना शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात दगड घातला. याप्रकरणी तिघा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विशाल पाटील हे त्यांच्या मित्रासमवेत तरुण भारत स्टेडियमसमोर असणाऱ्या पेट्रोल पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल घालण्यासाठी थांबले होते.
त्यावेळी पाठीमागून मोटारसायकलवरून तिघे आले. त्यांनी विशाल पाटील यांना मोटारसायकल पुढे घेण्यात सांगितले. यावेळी वादावादी झाली. यातून संबंधित तिघांनी विशाल पाटील यांना शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात दगड घालून जखमी केले, असे पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.