ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर; शेअर मार्केटच्या ऑनलाईन ट्रेडिंगमधून आकर्षक परतावा देण्याच्या अमिषाने मलेशियास्थित महिलेने बेकरी व्यावसायिकाला २० लाखांचा गंडा घातला. मार्च ते जून २०२२ या कालावधीत ही रक्कम संबधित रिका लिम (मलेशिया) हिने सांगितलेल्या खात्यावर पाठविण्यात आली होती. मात्र, ही वेबसाईटअचानक बंद झाल्याने २० लाखांची फसवणूक झाल्याची फिर्याद उदय विठ्ठल माळी (वय ५०, रा. टाकाळा मेन रोड) यांनी राजारामपुरी पोलियांत दिली.
फिर्यादी उदय माळी यांचा बेकरी व्यवसाय आहे. मार्च २०२२ मध्ये त्यांच्या मोबाईलवर रिका लिम हिने व्हॉटसअॅप मॅसेज पाठविले. सिंगापूरची केपल डायमंड ही कंपनी जागतीक दर्जाची शेअर मार्केटींगची कंपनी असून ती भारत व मलेशियासाठी टेक्नीकल अॅडव्हायझर म्हणून काम करीत असल्याचे सांगितले. शेअर्स व लॉटस खरेदीचा व्यवहार कंपनी करते यामध्ये पैसे गुंतविले तर तुम्हाला भरपूर फायदा मिळवून देतो असे सांगितले. केप्पल डायमंडस डॉट कॉम ही ऑनलाईन वेबसाईटवर खाते उघडू ट्रेडिंग सुरु केले. सुरुवातीला ५० हजारांच्या गुंतवणुकीवर फायदा मिळाल्याचे माळी यांना भासविण्यात आले.




