ताजी बातमी ऑनलाईन टीम
पेठवडगाव : आपल्या चार वर्षांच्या मुलासह महिलेने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सौ. लक्ष्मी मनोज भस्मे (वय 28) असे तिचे नाव आहे. उपचार सुरू असताना मुलगा वेदांत भस्मे याचा मृत्यू झाला. महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. तिच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आत्महत्या की हत्या? या दिशेने पोलिस तपास करत आहेत.
लक्ष्मी यांचे पती मनोज भस्मे यांचे विजय ज्वेलर्स हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे मनोज सुवर्ण व्यवसायानिमित्त अंबपला गेले होते. लक्ष्मी व वेदांत बराचवेळ झाला तरी तिसऱ्या मजल्यावरून खाली आले नाहीत. त्यामुळे लक्ष्मी यांच्या आई तिसऱ्या मजल्यावर गेल्या. तेथे त्यांना मुलगी व नातू बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांनी शेजारीच राहणाऱ्या धीरज भोगाळे या युवकाला बोलावले. त्यानंतर लक्ष्मी व वेदांतला उपचारासाठी पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वेदांतचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. लक्ष्मी यांच्यावर उपचार सुरू आहेत. वेदांतवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. वडगावचे पोलिस निरीक्षक भैरवनाथ तळेकर अधिक तपास करत आहेत.
कोल्हापूर ; मुलाला विष पाजून आईचा आत्महत्येचा प्रयत्न; मुलाचा मृत्यू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -