Friday, November 22, 2024
Homeक्रीडाIND vs WI T20I : रोमहर्षक सामन्यात 5 विकेटने भारताचा पराभव, डेव्हॉन...

IND vs WI T20I : रोमहर्षक सामन्यात 5 विकेटने भारताचा पराभव, डेव्हॉन थॉमसची 31 धावांची धमाकेदार खेळी!

वेस्ट इंडिजने (West Indies) दुसरा टी-20 सामना 5 गडी राखून जिंकून 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजला 139 धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी 19.2 षटकांत 5 विकेट गमावून पूर्ण केले. ब्रँडन किंगने (Brandon King)संघाकडून सर्वाधिक 68 धावा केल्या. तर डेव्हॉन थॉमसने (Devon Thomas) शेवटच्या षटकात धमाकेदार फलंदाजी करत अवघ्या 19 चेंडूत 31 धावा काढून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

31 चेंडूत 31 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी घातक गोलंदाजी करताना ओबेड मॅकॉयने (Obed McCoy) 6 बळी घेतले. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचबरोबर जेसन होल्डरने 2 विकेट्स आपल्या नावावर केल्या.

भारताचा एकही फलंदाज खेळला नाही

दुसऱ्या T20 मध्ये टीम इंडियासाठी एकही फलंदाज मोठी इनिंग खेळू शकला नाही. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कर्णधार रोहित शर्माने खाते न उघडता ओबेड मॅकॉयच्या चेंडूवर स्लिपमध्ये कॅच दिली आणि गोल्डन डकवर बाद झाला. मॅकॉयने आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टीम इंडियाला आणखी एक धक्का दिला आणि 6 चेंडूत 11 धावा खेळत असलेल्या सूर्यकुमार यादवलाही बाद केले.  अल्झारी जोसेफने भारताला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरू दिले नाही आणि श्रेयस अय्यरला 10 धावांवर बाद केले. या सामन्यात ऋषभ पंतने चांगली सुरुवात केली. तो 12 चेंडूत 24 धावा खेळत होता. तो मोठी खेळी खेळेल असे वाटत होते, पण अकिल होसेनच्या चेंडूवर ओडेन स्मिथने त्याला झेलबाद केले. हार्दिक पांड्यालाही जेसन होल्डरने 31 धावांवर बाद केले.

खेळाडूंचे सामान न मिळाल्याने सामन्याला झाला विलंब

पहिल्यांदाच टी-20 सामना पावसामुळे नाही, तर खेळाडूंचे सामान न मिळाल्याने उशीरा सुरु झाला. सेंट किट्सच्या बॅसेतेरे मैदानावर हा सामना खेळवला जाणार होता, मात्र त्रिनिदादहून खेळाडूंचे सामान सेंट किट्सपर्यंत पोहोचले नाही. यामुळे रात्री 8 वाजता सुरू झालेला सामना रात्री 11 वाजता सुरू झाला.

या मालिकेत भारत 1-0 ने आघाडीवर होता, मात्र दुसरा सामना गमावल्यानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. भारताने हा सामना जिंकला असता तर वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक सामने खेळणारा संघ बनला असता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंग. टीम इंडियाने आपल्या प्लेइंगमध्ये बदल केला आहे. रवी बिश्नोईच्या जागी आवेश खानला संधी मिळाली आहे.

वेस्ट इंडिज: काइल मेयर्स, ब्रॅंडन किंग, निकोलस पूरन (कॅप्टन आणि विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, डेव्हन थॉमस, जेसन होल्डर, अकिल होसेन, ओडेन स्मिथ, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -