टाटा मोटर्स कंपनी आपल्या ग्राहकांसाठी प्रत्येक वेळी जबरदस्त फीचर्स आणि कमी किमतींसह नवनवीन कार मार्केटमध्ये आणत असते. टाटा मोटर्सने आपल्या हॅचबॅक कार Tiago NRG चा नवीन XT व्हेरिएंट लॉन्च केला आहे. कंपनीने Tata Tiago NRG XT प्रकाराची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे.
टाटा मोटर्सने गेल्या वर्षी टियागोची NRG सीरिज मार्केटमध्ये आणली होती. टाटा कंपनीने ही सीरिज खास तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन तयार केली होती. आता याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कंपनीने आपला नवीन व्हेरिएंट लाँच केला आहे. टाटा मोटर्सने ऑगस्ट 2021 मध्ये फेसलिफ्टेड Tiago NRG लाँच केली होती ही कार फक्त पूर्णपणे लोडेड XZ व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होती. आता एक नवीन परवडणारी वर्जन आहे ज्याची किंमत जवळपास 40,000 रुपयांनी कमी आहे.
XT व्हेरियंटचे फीचर्स –
Tiago NRG ने त्याच्या नवीन XT व्हेरिएंटमध्ये 14-इंच हायपरस्टाईल व्हील, 3.5-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि फ्रंट फॉग लॅम्प यासारखे फीचर्स दिले आहेत. याशिवाय, ‘नियमित’ Tiago चे XT व्हेरिएंट देखील 14-इंच हायपरस्टाईल व्हील, हाइट-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि रियर पार्सल शेल्फ यासारख्या फीचर्ससह अपडेट केला गेला आहे.
टाटाने लॉन्च केली 6.42 लाखांची नवीन कार, जाणून घ्या दमदार फीचर्स!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -