मिरज ग्रामीण एस.टी स्टॅन्डचे पाठीमागील बाजूस चाॅकलेटी शर्ट व निळी जिन्स घातलेला दाढी वाढलेला एक इसम हा आपले कब्जात वन्य प्राणी बिबट्या यांच्या कातड्याची तस्करी करणार असल्याचे गोपीनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती महात्मा गांधी पोलीसांना मिळाली कारवाई करण्याकरीता सहा.पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, पोलिस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे,अभिजीत पाटील,अमोल आवळे,प्रवीण हुक्कीरे,बसवराज कुदंगोळ,गणेश कोळेकर, प्रशांत पुजारी,वनक्षेत्रपाल युवराज पाटील,वनपाल तुषार भोरे,वनरक्षक सागर थोरवत हे सर्व मिळालेल्या बातमी नंतर कारवाई करण्यासाठी रवाना झाले.
मिळालेल्या बातमीने वाॅच करत थांबले असता एका प्लास्टिकच्या पिशवी घेऊन एक इसम आला.त्याची विचारपूस करत असताना त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याची पिशवी चेक केली असता त्यामध्ये एका वन्य प्राणी बिबट्या चे कातडे दिसले.वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी कातडे पाहिले असता हे कातडे बिबट्या चे असल्याचे सांगितले.कातड्या सोबत समीर जयवंत नारकर वय वर्षे ३२ राहणार रुम नं १ दिलीप नाखवा चाळ मीठ बंदर रोड पिंपळ छाया गणेश मंदिर जवळ ठाणे.मुळ गाव फणसगाव ता.देवगड जि.सिंधुदुर्ग याला महात्मा गांधी पोलीसांनी अटक करुन ५ लाख २५ हजार रुपयांचे बिबट्या या प्राण्यांचे कातडे जप्त केले आहे.जप्त केलेले कातडे हे सहा.पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या उपस्थितीत वनक्षेत्रपाल युवराज पाटील यांनी पंचनामा करुन ताब्यात घेतले आहे.