Monday, February 24, 2025
Homeजरा हटकेश्रावणनिमित्त झटपट तयार करा उपवासाचा टेस्टी चिवडा!

श्रावणनिमित्त झटपट तयार करा उपवासाचा टेस्टी चिवडा!



सध्या श्रावण महिना सुरु आहे. 8 ऑगस्टला श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार आहे. श्रावण महिन्याला खूपच पवित्र महिना मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी अनेक जण उपवास करतात. श्रावणी सोमवारनिमित्त (Shravan Somvar Fasting) उपवास ठेवून भगवान शंकराची (Bhagwan Shankar) भक्ती भावाने पूजा केली जाते. श्रावण सोमवारनिमित्त (Shravan Somwar) तुमचा देखील उपवास असेल तर तुम्ही घरीच झटपट उपवासाचा चिवडा (Upvasache Kaap) तयार करु शकता. अगदी सोपी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी (Shravan Special Recipe ) आहे. हा टेस्टी उपवासाचा चिवडा कसा तयार करायचे हे आज आपण जाणून घेणार आहोत…



उपवासाचा चिवडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
– चार ते पाच बटाटे
– तीन ते चार मिरच्या
– मीठ
– कडीपत्ता
– पिठी साखार
– एक वाटी शेंगदाणे
– एक वाटी काजू
– एक वाटी मनुके
– तळण्यासाठी तेल

असा तयार करा उपवासाचा चिवडा –
उपवासाचा चिवडा तयार करण्यासाठी सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या बटाट्याची साल काढून बट्याट्याचा साडसर किस करुन घ्या. किस झाल्यानंतर तो तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर एका कापडामध्ये ठेवून ते व्यवस्थित पिळून घ्यायचे आहे. यामुळे बटाट्याच्या किसातील पाणी निघून जाईल आणि तळणे सोपे होईल. आता एका कढईमध्ये तेल गरम करुन घ्या. त्यामध्ये बटाट्याचा किस थोडा थोडा टाकून लालसर रंग येईलपर्यंत कुरकुरीत तळून घ्या. त्यानंतर याच गरम तेलामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून ते सुद्धा खरपूस तळून घ्यायचे आहे. त्यानंतर याच तेलात एक वाटी काजू आणि मनुके तळून घ्या. त्यानंतर कडिपत्ता आणि मिरचीचे मोठ मोठे तुकडे देखील तळून घ्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -