Tuesday, July 8, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

कोल्हापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; जिल्ह्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यानेच बोगस डॉक्टरांनी रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू केल्याचे दिसत आहे. तक्रार आली, तरच आरोग्य विभाग तपासणीसाठी पुढे येतो. दुसरीकडे गाव, तालुका पातळीवरच आरोग्य समित्यांनी बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. पण, या समित्या कुचकामी ठरल्या आहेत. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर विरोधी समिती कारवाई करते, मग तालुक्यातील समितीला ते का शक्य होत नाही, असा सवाल आहे.

ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान बसवून जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडला आहे. बोगस डॉक्टरांचा खुलेआम गोरखधंदा सुरू आहे. थातूरमातूर वैद्यकीय सेवेच्या भरवशावर बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. शासकीय आरोग्य यंत्रणेने छापे टाकून अशा डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -