Monday, July 7, 2025
Homeसांगलीसांगली : जत भागात जोरदार पाऊस

सांगली : जत भागात जोरदार पाऊस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जत गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि परिसरात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सायंकाळी डफळापूर, जिरग्याळ, बिळूर, देवनाळ, मेंढगिरी, उंटवाडी, मुंचडी परिसरात पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे उंटवाडी रावळगुंडवाडी, मेंढेगिरी, बिळूर या भागातील ओढ्या-नाल्यांना पाणी आले.

तालुक्यातील डफळापूर परिसरात जवळ 80 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. माडग्याळ, उमदी, संख भागातही या पावसाची हजेरी कमी-जास्त प्रमाणात आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे कोळेगिरी, सोरडी, सिद्धनाथ तलावात मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे. या भागात पाण्याची पातळी चांगली वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -