Thursday, December 18, 2025
Homeकोल्हापूरचंद्रकांत पाटील होणार पीडब्ल्यूडी व सहकारमंत्री

चंद्रकांत पाटील होणार पीडब्ल्यूडी व सहकारमंत्री

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर ; चंद्रकांत पाटील यांच्याकडे सहकार खात्याची धुरा सोपविली जाणे शक्य आहे. यापूर्वी त्यांनी काहीकाळ सहकार खात्याची धुरा वाहिली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या भागातील ते लोकप्रतिनधिी आहेत.

थेट मुद्द्याला हात घालण्याच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांशी थेट पंगा घेतला होता. आताही सहकार खाते त्यांच्याकडे आल्यास ते काँगेस राष्ट्रवादीच्या विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वाला लगाम घालू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्याकडे सहकार खाते सोपवले जाण्याची शक्यता आहे. सहकार खात्याबरोबरच त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते सोपविले जाण्याची शक्यता आहे. याही खात्याचा कामकाज त्यांनी पूर्वी पाहिले आहे.
भाजपने 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल सुरू केली आहे. त्यासाठी त्यांनी राज्यातील 16 मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. या दोन मतदारसंघातील रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय अलिकडेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -