Sunday, August 10, 2025
Homeसांगलीसांगली : एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

सांगली : एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही- मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी विटा येथे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या दिवंगत पत्नी शोभाकाकी बाबर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. (sangli news) आमदार अनिलभाऊ बाबर यांची भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी आमदार बाबर यांचे सुपुत्र माजी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, तानाजी पाटील, राजेश क्षिरसागर आदी उपस्थित होते. (sangli news) यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. विरोधकांचे कामच टीका करण्याचे असते, असे सांगितले.

यावेळी पत्रकारांनी ‘यावर्षीचे ध्वजारोहन बिन खात्याच्या मंत्रांच्या हस्ते होत आहे,अशी टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे’ छेडले असता त्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले “विरोधकांचे कामच आहे टीका करण्याचे आणि आमचे काम आहे सरकार चालवण्याचे. आम्ही एका महिनाभरात किती निर्णय घेतले ते आधी तपासून बघा” अशी प्रतिक्रिया दिली. तसेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत देण्यात येईल, कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाला तसे आदेश दिले आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार अनिल राव बाबर थोरले बंधू दिलीपराव बाबर, धाकटे बंधू शरद राव बाबर आणि कुटुंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -