Thursday, July 31, 2025
Homeतंत्रज्ञानब्रेकिंग! केंद्र सरकारने केले 8 YouTube चॅनल ब्लॉक, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठी...

ब्रेकिंग! केंद्र सरकारने केले 8 YouTube चॅनल ब्लॉक, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठी कारवाई

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनेक भारतीय आणि पाकिस्तानी यूट्यूब न्यूज चॅनेलवर कठोर कारवाई केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसार केल्याप्रकरणी 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत. या YouTube चॅनेलमध्ये 7 भारतीय आणि 1 पाकिस्तान आधारित YouTube चॅनेलचा समावेश आहे.

हे चॅनेल IT नियम, 2021 अंतर्गत ब्लॉक करण्यात आले आहे. ब्लॉक केलेले हे यूट्यूब चॅनेल 114 कोटीहून अधिक वेळा पाहिले गेले आहेत आणि या चॅनेलचे 85 लाख 73 हजार सबस्क्राइबर आहेत.

चॅनेलद्वारे धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम
यापैकी काही YouTube चॅनेलद्वारे प्रकाशित केलेल्या सामग्रीचा उद्देश भारतातील धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवणे हा होता.

चॅनेलद्वारे धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याचे काम यापैकी काही YouTube चॅनेलद्वारे प्रकाशित केलेल्या सामग्रीचा उद्देश भारतातील धार्मिक समुदायांमध्ये द्वेष पसरवणे हा होता. ब्लॉक केलेल्या YouTube चॅनेलच्या विविध व्हिडिओंमध्ये खोटे दावे करण्यात आले. त्याच्या उदाहरणांमध्ये बनावट बातम्यांचा समावेश आहे जसे की भारत सरकारने धार्मिक वास्तू पाडण्याचे आदेश दिले आहेत; भारत सरकारने धार्मिक सण साजरे करण्यावर बंदी घातली आहे, भारतात धार्मिक युद्धाची घोषणा इ. अशाप्रकारच्या मजकूरातून जातीय तेढ निर्माण होण्याची आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे आढळून आले.

खोटी आणि संवेदनशील सामग्री YouTube चॅनेलचा वापर भारतीय सशस्त्र सेना, जम्मू आणि काश्मीर इत्यादी विविध विषयांवर खोट्या बातम्या पोस्ट करण्यासाठी देखील केला गेला. राष्ट्रीय सुरक्षा आणि परकीय राज्यांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध याच्या दृष्टीकोनातून सामग्री पूर्णपणे खोटी आणि संवेदनशील असल्याचे आढळून आले.

मंत्रालयाने अवरोधित केलेली सामग्री भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, राज्याची सुरक्षा, परकीय राज्यांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी हानिकारक असल्याचे आढळून आले. त्यानुसार, माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A च्या कक्षेत सामग्री समाविष्ट करण्यात आली.

102 YouTube खात्यांवर कारवाई या कारवाईसह, डिसेंबर 2021 पासून मंत्रालयाने 102 YouTube आधारित न्यूज चॅनेल आणि इतर अनेक सोशल

102 YouTube खात्यांवर कारवाई

या कारवाईसह, डिसेंबर 2021 पासून मंत्रालयाने 102 YouTube आधारित न्यूज चॅनेल आणि इतर अनेक सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -