सैफ अली खानची मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan)आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची लाडकी जान्हवी कपूर (Janhvi Kapoor)या लोकप्रिय स्टार किड्स (Star Kids)आहेत. दोघींनीही आपल्या अभिनय आणि खास शैलीमुळे इंडस्ट्रीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या दोघी आता पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. नुकतेच जान्हवी कपूरने आणि सारा अली खानने त्यांच्या सोशल मीडिया (Social media)अकाऊंटवरून याबाबतचे संकेत दिले आहेत.
जान्हवीने शेअर केला फोटो
अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकताच तिचा आणि सारा अली खानचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये ती हसताना दिसत आहे, तर सारा अली खान थोडी आश्चर्यचकित दिसत आहे. साराच्या चेहर्यावरचे हावभाव पाहून तिला काहीतरी सरप्राईज मिळाल्यासारखे वाटते. फोटोमध्ये दोघी एकत्र बसलेल्या दिसत आहेत.
कॅप्शन पाहून मिळाले संकेत
जान्हवीने हा फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये जान्हवी स्काय ब्लू कलरच्या टॉपमध्ये दिसत आहे, तर सारा अली खानने व्हाइट टॉप घातला आहे. दोघींचा लूक जबरदस्त दिसत आहे. जान्हवीने यासाठी मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. तिने लिहिले, ‘ट्रॅव्हल अॅडव्हेंचर, कॉफी डेट्स आणि आता को-स्टार्स!’ जान्हवीच्या कॅप्शनवरून हे स्पष्ट झाले आहे की दोघीही लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. मात्र, ती कोणत्या प्रोजेक्टबद्दल बोलत आहे, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
यूजर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जान्हवी कपूरच्या या पोस्टवर यूजर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद येत आहे. यावर सारा अली खानने लिहिले आहे की, ‘हे शानदार होणार आहे.’ यावर झोया अख्तरने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. एका यूजरने लिहिले, ‘इम्प्रेसिव.’ आणखी एका युजरने लिहिले की, ‘आम्ही तुम्हा दोघांना एकत्र पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत.’
‘कॉफी विथ करण 7’मध्ये दिसल्या होत्या एकत्र
अलीकडेच सारा आणि जान्हवी करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’ मध्ये देखील सहभागी होण्यासाठी एकत्र आल्या होत्या. इथे दोघींनी अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या. या शोदरम्यान दोघींची केमिस्ट्री जबरदस्त होती. अशा परिस्थितीत दोघींना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. जान्हवीशिवाय सारानेही एक पोस्ट शेअर केली आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सोबत हॉट कॉफी पिण्यापासून ते आता को स्टार. प्रतिक्षा करा आणि पाहा. तुम्हाला काय वाटते ते देखील कळवा’ असे कॅप्शन साराने टाकेल आहे. यानंतर सोशल मीडियावर या दोघी चर्चेचा विषय ठरत आहेत.