Friday, August 1, 2025
Homeक्रीडाभारत विरुद्ध झिम्बाब्वे दुसरा वनडे सामना आज, कधी आणि कुठे पाहता येणार.?

भारत विरुद्ध झिम्बाब्वे दुसरा वनडे सामना आज, कधी आणि कुठे पाहता येणार.?

भारत आणि झिम्बाब्वे (India vs Zimbabwe 2nd ODI) संघांमध्ये 18 ऑगस्टला पहिला वनडे सामना होता, तो भारताने जिंकला असून पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. आता तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना (2nd ODI) आज (20 ऑगस्ट) खेळवला जाणार आहे.

मागील काही दिवसांमध्ये भारतीय संघाने जोरदार कामगिरी केल्याचं दिसत आहे. संघाची तात्पुरती मदार शिखर धवनवर असताना त्याच्या नेतृत्वात सामन्यात आधी दमदार गोलंदाजीसह नंतर उत्तम अशी फलंदाजी देखील भारताने केली. त्याआधी भारताने इंग्लंड आणि वेस्ट इंडीजला त्यांच्याच भूमीत हारवून आता भारत झिम्बाब्वेला मात देण्यासाठी युवा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देत आहे. तर जाणून घ्या आजच्या सामन्याविषयी..

▪️ आज 20 जुलै ऑगस्ट भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी सामना सामना सुरु होईल.

▪️ आजचा दुसरा वनडे सामना हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवला जाणार आहे.

▪️ भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील आजचा दुसरा वनडे सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. तसंच सोनी लिव्ह Sony LIV App वरही सामना पाहता येणार आहे.

भारताचा संभाव्य संघ: केएल राहुल (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर, शाहबाझ अहमद.

झिम्बाब्वेचा संभाव्य संघ: रेगीस चकाब्वा (कर्णधार), रायन बुर्ल, तनाका चिवांगा, ब्रॅडली इवांस, ल्यूक जाँगवे, इनोसंट काया, ताकूदझ्वँनशी केईतानो, क्लाईव्ह मडांडे (यष्टीरक्षक), वेस्ली मॅदवेर, तदीवांशे मरुमानी, जॉन मसारा, टोनी मुनयोंगो, रिचर्ड येनगारावा, व्हिक्टर एनवायुची, सिकंदर रझा, मिल्टन शुम्बा, डोनाल्ड तिरीपानो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -