Friday, August 1, 2025
Homeसांगलीसांगली : जिल्ह्यात 23 'मर्डर'ची फाईल 'क्लोज'

सांगली : जिल्ह्यात 23 ‘मर्डर’ची फाईल ‘क्लोज’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सांगली : सचिन लाड सांगली, मिरजेसह जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीचा आलेख चिंताजनक आहे. खुनाच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. आठ महिन्यांत तब्बल 42 जणांचा मुडदा पडला. चार खुनांचा अजूनही उलगडा झालेला नाही. दहा वर्षांतील खुनातील आलेखावर ‘नजर’ टाकली, तर 23 खुनांच्या घटनांत धागेदोरे न लागल्याने तपास ‘फाईल’ही ‘क्लोज’ करण्यात आली आहे. खुनांच्या वाढत्या गुन्ह्यांचा आलेख नजरेत भरण्यासारखा आहे. अनेक खुनांचा उलगडा करण्यात स्थानिक पोलिस व गुन्हे अन्वेषण विभागाला अपयश आले आहे. पंचशीलनगर येथील प्रशांत पावसकर या तरुणाचा दगड बांधून कृष्णा नदीत फेकून खून करण्यात आला. दोन महिने तपास झाला, पण धागेदोरे न लागल्याने तपासाची फाईल बंद करण्यात आली.



तासगाव तालुक्यातील पाचव्या मैलावर एका गर्भवतीचा खून खून करण्यात आला. तिची ओळखही पटविण्यात यश आले नाही. त्यामुळे हा खूनही पोलिस दप्तरी ‘अनडिटेक्ट’ राहिला आहे. कुपवाडला बाळासाहेब दरगाववर यांचा खून करुन नदीत मृतेदह फेकला गेला. याचाही छडा लागलेला नाही. सांगलीत कृष्णा नदीच्या काठावर एकाचा दगडाने ठेचून खून झाला. त्याचीही ओळख पटविण्यात यश आले नाही. तपास पुढे सरकलाच नाही. रिक्षाचालकाने एका प्रवाशाचा रिक्षातच भोसकून खून केला. त्याचीही ओळख पटलेली नाही. असे जवळपास 23 खून ‘अनडिटेक्ट’ राहिले.

त्याच्या तपासाची फाईल ‘क्लोज’ करण्यात आली आहे. आता तर चार महिन्यात तर खुनांची मालिकाच सुरू आहे. अनैतिक संबंध, पूर्ववैमनस्य, आर्थिक वाद, शेतीचा वाद, कौटुंबिक वादातून खुनाच्या घटना घडल्या. जाडरबोबलाद (ता. जत) येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आलेले नाही. बेडग (ता. मिरज) येथे वृद्धेचा शेतात वृद्धेचा भरदिवसा खून झाला. त्याचाही अजून उलगडा झालेला नाही. कासेगाव (ता. वाळवा) येथील वृद्धाचा खून ‘अनडिटेक्ट’च राहिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -