ताजी बातमी ऑनलाईन टीम
16 वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.मिरज शहर पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.आरोपी समीर शहानवाज मुजावर शास्त्री चौक मिरज आणि त्याला मदत करणारी महिला नजरीन मेहबूब शेख राहणार समता नगर या दोघांवर बाल लैंगिक अत्याचार आणि अट्रोसिटी गुन्हा दाखल झाला आहे.मे महिन्यात मिरज शास्त्री चौक येथे नजरीन शेख या महिलेने 16 वर्षाच्या मुलीला पसारा लावण्याच्या उद्देशाने भाड्याच्या घरात बोलावून घेतले समीर मुजावर आणि 16 मुलीला घरात कोंडून बाहेरून कडी लावली.यावेळी समीर मुजावर याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि तिला बाहेर कोठे सांगू नये म्हणून धमकी दिली.अशी तक्रार पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने मिरज शहर पोलिसांत दिली आहे.दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपविभागीय अधिकारी टिके अधिक तपास करत आहेत.
मिरजेत 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार:तरुण आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेवर:बाल लैंगिक अत्याचार आणि अट्रोसिटी गुन्हा दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -