ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज कोल्हापूर महापालिका जुना टोल नाका या ठिकाणी छोटा टेंपो आणि दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात ,दीपक तोडकर राहणार शिरोली दुमाला कोल्हापूर हा तरुण जागीच ठार झाला आहे.तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.वाहतूक नियंत्रण कर्मचाऱ्यांनी आणि प्रवाशांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.संतोष सुरेश चौगुले राहणार सावर्डे हा कर्नाटक येथून छोटा टेंपो मध्ये गवारी भाजीपाला घेऊन वडगाव कडे जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत भीषण अपघात झाला.दुचाकी वाहनावरून दोघे रस्त्यावर पडल्याने डोक्याला जबर मारा लागला आहे.
त्यामुळे रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता रस्तावर फिरणारी भटकी कुत्री दुचाकी वाहनांच्या आडवी आल्याने दुचाकींचा तोल सुटला दुचाकी वाहन छोटा टेम्पो वर येऊन आदळल्याने अपघात झाल्याची माहिती छोटा टेंपो चालक चौगुले याने दिली आहे अपघाताची माहिती महात्मा गांधी चौकी पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती या मार्गावर उघडया चिकन वेस्टज टाकले जात असल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे भटकी कुत्री रस्ता ओलांडत असताना अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे .महात्मा गांधी चौकी पोलीस अधिक तपास करत आहेत.