शिक्षण घेतल्यानंतर शोध सुरु होतो तो म्हणजे मनाजोग्या नोकरीचा. (latest govt jobs) अनेकांना मनाजोगी नोकरी मिळतेसुद्धा. पण, त्यातही काही वर्षांनंतर कामाचा ताण, कमी पगार, सुविधांचा अभाव या साऱ्यामुळं नकोसं वाटू लागतं आणि मग आपण सरकारी नोकरीत का नाही, हा प्रश्न उभा राहतो.
अनेकजण इतके एककेंद्री असतात, की (latest govt jobs) सुरुवातीपासूनत ते सरकारी नोकरीच्या शोधात विविध संधी चाचपडत असतात. अशाच होतकरु तरुण वर्गासाठी महाराष्ट्र सरकार मोठी संधी आणण्याच्या तयारीत आहे.
वर्षभरात 75 हजार सरकारी नोक-या उपलब्ध होणार आहे. विविध शासकीय विभागात 75 हजार पदं रिक्त आहेत. ही पदं भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. महाराष्ट्र राज्य सरकारच्या 29 प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा आणि पदोन्नतीची मिळून 2 लाख 193 पदं रिक्त असल्यासंदर्भातील लक्षवेधी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांनी मांडली होती. त्याला शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं.
एमपीएससीच्या कक्षेतील रिक्त पदं 100 टक्के भरण्यासही परवानगी देण्यात आली. तर उर्वरित 50 टक्के पदं भरली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांपैकी 1200 पदांवर नियुक्त्या देण्याचाही निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, सदरील कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर उर्वरित नियुक्त्या देण्यात येणार आहेत.