Saturday, February 21, 2026
Homeमहाराष्ट्रब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीवर जीवघेणा हल्ला

तरुणीनं रिलेशनमध्ये राहण्यासाठी नकार दिल्याने तिला चारचौघात जीवघेणी मारहाण करून संपवण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकचा पाथर्डी फाटा परिसरात पेट्रोल पंपावर (cng pumphear me) काम करणाऱ्या महिलेवर तिचाच मित्राने खुनी हल्ला केल्याची घटना समोर आली. हल्ला करणारा तरुण आणि महिलेत प्रेम संबंध होते. मात्र या महिलेने (cng pumphear me) या तरुणासोबत राहण्यास नकार दिल्याने त्याने हा हल्ला केल्याच समोर आला आहे.नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात ही घटना घडली.

जाधव पेट्रोलियम इथे काम करणाऱ्या जुबेदा युसूफ खान या ३७ वर्षीय महिलेवर प्रेम असलेल्या प्रमोद प्रकाश गोसावीने खुनी हल्ला केला. जुबेदा खान आणि प्रमोद गोसावी यांच्यात गेल्या एक वर्षापासून प्रेम संबंध होते. मात्र एका बलात्काराच्या गुन्ह्यात प्रमोद गोसावी याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या महिलेने त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला.

याच रागातून सदर संशयित आरोपीने या महिलेला ती काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन याचा जाब विचारत खुनी हल्ला केला. भरदिवसा घडलेला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर जखमी महिलेला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या हल्ल्यात या महिलेच्या डोक्यावर आणि पायावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. तिला पुढील उपचारासाठी पेट्रोल पंप व्यवस्थापनाने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -