देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या अधिपत्याखालील असलेल्या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरामध्ये (karveer ambabimandir )प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने समितीकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मंदिरामध्ये दिवसागणिक हजारो लोक दर्शनासाठी येत असतात.
सदर भाविकांकडून अर्पण होणारे हार व फुले तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात जमा होत आहे.साहित्य हे सुरक्षितरित्या बाहेर काढणे क्रम प्राप्त झाले आहे तसेच यासाठी कमी प्रमाणात मनुष्यबळाचा वापर करण्याच्या दृष्टीने तसेच लाडू प्रसाद व इतर साहित्य मंदिरामध्ये आणण्यासाठी दोन बाईक घेण्याचे समितीच्या वतीने निश्चित करण्यात आले होते.
या योजनेअंतर्गत सुमारे चार लाख 50 हजार रुपये किमतीच्या बॅटरीवर चालणाऱ्या दोन पुष्पक हायड्रोलिक वाहन आज अंबाबाईच्या चरणी बेंगलोर येथील भाविक मेकिपत्ती राजगोपाल रेड्डी यांनी अर्पण केल्या. त्यापैकी पहिली गाडी आज मंदिर परिसरातील लाडू वाहतूक करण्याच्या सेवेसाठी रुजू करून घेण्यात आली. सदर गाडीच्या चाव्या आज समितीचे सचिव श्री शिवराज नायकवडी यांनी रेड्डी यांच्याकडून स्वीकारल्या. यावेळी व्यवस्थापक महादेव दिंडे धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नेर्लेकर के रामराव तसेच देवस्थान समितीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.