सावरवाडी (ता.करवीर) तेथे गोकुळ दूध संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्याचा ट्रक ड्रायव्हरचा पशुखाद्य उतरत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन जागीच मृत्यू झाला. संदीप सखाराम देसाई (वय ४८) रा.म्हसवे (गारगोटी) असे त्यांचे नाव
आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महालक्ष्मी पशुखाद्याचा ट्रक सावरवाडी येथील भैरवनाथ दूध संस्थेत रात्री ८.१५ वाजन्याच्या सुमारास पशुखाद्याची पोती घेऊन आला होता. पोती उतरत असताना ट्रक ड्रायव्हर देसाई यांनी थोडी पोथी उतरल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्याने ते ट्रकच्या केबिनमध्ये जाऊन झोपले. उर्वरित पोती दोन बिहारी कामगारांनी उतरून घेतली. काम झाल्यानंतर त्यांना उठवण्यासाठी गेले असता ते जागीच मृत अवस्थेत आढळले. ग्रामस्थांनी सदर घटनेची माहिती मृताचे नातेवाईकांना माहिती दिली. सदर घटनेची माहिती समजतात गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील, सुपरवायझर के.वाय.पाटील व संजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. नातेवाईक मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर हॉस्पिटल येथे घेऊन गेले.